प्रवरा अभिमत विद्यपीठाने अमेरिकेतील तीन विद्यापीठांशी सामाजिक आरोग्य आणि विकास, वैद्यकीय आयुर्वेदिक बायोसायन्स औषधनिर्मिती, व्यवस्थापन व संशोधन आदी विषयांसाठी संयुक्त सामंजस्य करार केला आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
अमेरिकेतील नामांकीत विद्यापीठांच्या आमंत्रणानुसार राजेंद्र विखे यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. या भेटीत हे करार करण्यात आले.
अमेरिकेतील लुईवील विद्यापीठाची स्थापना सन १७९८ मध्ये झाली असून, या विद्यापीठाने कॅन्सरवर संवेदनशील उपचार लस निर्माण केली आहे. याच विषयावर संयुक्तिक सामंजस्य करार करण्यात आला. लुईविल विद्यपीठाच्या प्रतिनिधींना प्रवरा अभिमत विद्यापीठात निमंत्रित करण्यात आल्याचे विखे यांनी सांगितले.
अल्बमा बìमग-हॅम अब्लाबा स्टेट या विद्यापीठाच्या व्यवस्थापनाबरोबरच क्रिटीकल केअर, नैसíगक औषधे, सामाजिक आरोग्य आणि विकास अद्य्यावत व प्रगल्भ करण्यासाठी संयुक्तिक करार करुन वैद्यकीय व दंत वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लुईवील, अल्बमा ही विद्यापीठे व प्रवरा अभिमत विद्यपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबरमध्ये लोणी येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. विखे यांनी न्युयार्कमधील कोलंबिया विद्यापीठाला भेट देऊन विस्मृती व वृद्धापकालीन आजाराचे निदान व उपचारांची प्रयोगशाळा प्रवरा अभिमत विद्यापीठात सुरु करण्यासाठी या विद्यापीठाबरोबर संयुक्तिक सांमजस्य करार केला. यापूर्वीही अमेरिकेतीलच ड्रेक विद्यापीठाबरोबर प्रवरा अभिमत विद्यपीठाने करार केला आहे.
पूर्वीच्या सामंजस्य करारांनुसार अमेरिकेतील १३ विद्यार्थी आठ ते दहा आठवडय़ांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठात रुजू झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शशांक दळवी यांनी दिली.