‘घोटभर पाणी’, ‘गांधी आंबेडकर’ आणि ‘किरवंत’ या प्रेमानंद गज्वी लिखित आणि मराठी रंगभूमीवर गाजलेल्या तीन नाटकांचा संग्रह ‘द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स’  या नावाने इंग्रजीत आला आहे. ‘नवायन’ या दिल्लीच्या चोखंदळ प्रकाशनसंस्थेने काढलेल्या या पुस्तकातील दोन अनुवाद शांता गोखले यांनी, तर ‘किरवंत’चा अनुवाद म. द. हातकणंगलेकरांनी केला आहे.
दादरच्या शिवाजी मंदिरातील मॅजेस्टिक ग्रंथदालनात, अशोक कोठावळे यांनी या इंग्रजी नाटय़संग्रहाचे मुंबई-अवतरण (लाँचिंग) केले. भारतीय भाषांतील सवरेत्कृष्ट एकांकिकांपैकी एक असलेल्या ‘घोटभर पाणी’चा अनुवाद प्रथमच झाला असला, तरी ‘किरवंत’ आणि ‘गांधी-आंबेडकर’ या दोन्ही नाटकांचे अनुवाद यापूर्वी कन्नड व हिंदीत झाले होते. कन्नड अनुवादक डॉ. डी. एम. चोगले यांनीच गज्वींचे ‘शुद्ध बीजापोटी’ कन्नडमध्ये आणले, तर हिंदी ‘किरवंत’चा (अनु. पं. वसंत देव) प्रयोग प्रतिष्ठेच्या ‘भारत रंगमहोत्सवा’त सादर झाला. मराठीत नाना पाटेकरांनी अजरामर केलेल्या ‘तन माजोरी’ या गज्वीलिखित नाटकाचाही अनुवाद यापूर्वी हिंदीत झाला आहे, अशी माहिती कोठावळे यांनी दिली.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…