News Flash

अवैध वाळू उत्खननप्रश्नी महसूल यंत्रणेवर दबाव

तालुक्यात सहा महिन्यांपासून अवैधपणे वाळू उत्खनन होत असून पर्यावरणाची प्रचंड हानी होऊन, रस्त्यांची अवस्थाही बिकट होत आहे.

| December 3, 2013 07:18 am

तालुक्यात सहा महिन्यांपासून अवैधपणे वाळू उत्खनन होत असून पर्यावरणाची प्रचंड हानी होऊन, रस्त्यांची अवस्थाही बिकट होत आहे. या संदर्भात महसूल यंत्रणा दबावाखाली काम करून वाळूमाफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बाजार समिती सभापती अनिल पाटील यांनी केला आहे. महसूल प्रशासनाने वाळूमाफियांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
नदीपात्रातून वाळूचे अवैधरीत्या उत्खनन सर्रासपणे केले जात असल्याने लाखो रुपयांचा महसूल दररोज बुडवला जात आहे. स्थानिक प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली मूग गिळून बसले असल्याने महसूल यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. या प्रचंड वाळू उत्खननामुळे महसूल यंत्रणेतील काहींचा या व्यवसायात सहभाग असल्याचा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्त्यांना या प्रकरणात सहकार्य करून महसूल यंत्रणेवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत तहसीलदार प्रमोद हिले यांनी वाळूमाफियांवर कडक कारवाईचा इशारा दिला असून दुपटीने दंड वसूल करून वाळू वाहतूक करणारी वाहने ही व्यवसायासाठी आहेत की शेतीसाठी याची पडताळणी करून फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 7:18 am

Web Title: pressure on revenue system on illegal sand excavation question
टॅग : Bjp,Nashik
Next Stories
1 संदर्भ सेवा रुग्णालयाकडूनच एचआयव्हीग्रस्तांची हेळसांड
2 धुळे जिल्हा परिषदेसाठी उद्या मतदान
3 अद्वय हिरे व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी
Just Now!
X