पंढरपूरच्या कार्तिकी एकादशी यात्रेच्या काळात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वयंपाकासाठी शासनाकडून विनाअनुदानित दरानेच गॅस सिलेंडर घ्यावे लागणार आहेत. याबाबतचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी प्रसिध्दीला दिले आहे.
येत्या २२ ते २८ नोव्हेंबर या काळात पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. यात लाखो भाविक तथा वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होणार आहेत. आतापर्यंत यात्रा काळात रॉकेल व स्वयंपाक गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात मिळत होते. परंतु यंदा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार विनाअनुदानित दराने गॅस सिलेंडर घ्यावे लागतील. १४.५ किलोग्रॅम वजनाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर सध्या १२०४ रुपये एवढा आहे. या दरानुसारच सिलेंडर खरेदी लागणार असल्यामुळे वारकरी तथा भाविकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तथापि, या दरापेक्षा जास्त दराने गॅस सिलेंडर विकले जात असतील तर त्याबद्दल पंढरपूरच्या तहसीलदारांसह एचपीसीएल कंपनीचे विक्री अधिकारी पंकज चौधरी (मोबा. ९४२२२७७०२९) किंवा बीपीसीएल कंपनीचे अमित कुमार (९८९०५१९९२६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी मवारे यांनी केले आहे. अपहृताची माहिती कळविण्याचे आवाहन मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील चंद्रकांत बंडगर यांचे २००९ साली अपहरण झाले असून त्यांचा तपास लागत नाही. त्यामुळे हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आले आहे. बंडगर यांच्या अपहरणाबद्दलची माहिती कोणाला असल्यास त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या सोलापूर कार्यालयाशी (दूरध्वनी ०२१७-२३३११८११) संपर्क साधावा. योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पुण्यातील पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी कळविले आहे.