मुंबईतील बोरिवली येथील बलात्कार प्रकरणातील कैद्याने तळोजा कारागृहामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली. या कैद्याचे नाव रमेश वटारे (४५) असे आहे. ठाणे व त्यानंतर तळोजा कारागृहात वटारे हा शिक्षा भोगत होता. खारघर पोलीस ठाण्यात या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी वटारे याला त्याच्या पत्नीच्या निधनाची व मुलाच्या अपघाताची बातमी त्याची मुलगी प्रियंका हिच्याकडून समजली. त्यानंतर आपली मुलगी प्रियंका ही एकटी कशी राहणार याच चिंतेने त्याने आत्महत्या केल्याचा संशय कारागृह पोलिसांनी व्यक्त केला आहे. वटारे ज्या कोठडीत होता तेथे अन्य कोणीही कैदी नव्हते. वटारे याच्या आत्महत्येची चौकशी खारघर पोलीस करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 12:18 pm