News Flash

खाजगी प्राथमिक शाळा शिक्षक वेतनापासून वंचित

‘चांगले दिवस येणार आहेत’ या आशेने भारतात आनंद साजरा होत असला तरी दुसरीकडे राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्याच्या शिक्षण विभागाने अत्यंत निर्ममतेने त्रास देणे

| May 22, 2014 01:07 am

‘चांगले दिवस येणार आहेत’ या आशेने भारतात आनंद साजरा होत असला तरी दुसरीकडे राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्याच्या शिक्षण विभागाने अत्यंत निर्ममतेने त्रास देणे सुरू ठेवले आहे.
दोन महिन्यांपासून शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर राज्याचा शिक्षण विभाग अन्यायावर अन्याय करीत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याची योजनाच विभागाने आखली असल्याचा आरोप खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकेतर कर्मचारी संघाने केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेतून वेतन मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे. शासन निर्णय होऊन देखील व्यक्तिगत स्वार्थापायी मुख्यमंत्री शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
प्राथमिक शाळांमध्ये आता शिक्षकेतर कर्मचारी राहणार नाहीत. शिक्षकच झाडू लावणार आहेत! तेच घंटा वाजवणार आहेत आणि शाळेची स्वच्छता देखील तेच करणार आहेत. शिक्षण हक्कांतर्गत बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारची आहे आणि प्राथमिक शाळांमध्येच शिक्षकेतर वर्ग अत्यंत आवश्यक आहे. मुले लहान असल्यामुळे त्यांची स्वच्छता, त्यांची देखभाल इत्यादींची जबाबदारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अधिक असते. परंतु शासन प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी मंजूर करण्याच्या विरोधात आहे आणि जे कार्यरत आहेत, त्यांची पदे संपवण्याची योजना बनलेली आहे.
अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून समायोजन झालेले नाही. त्यामुळे त्यांना आतापर्यंत वेतन मिळालेले नाही. म्हणूनच त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. सरकारच्या धोरणाच्या विरोधात कर्मचारी वर्गात असुरक्षिततेची भावना पसरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. म्हणूनच सरकारच्या नीतीच्या विरोधात तीव्र लढाई लढण्याकरता सर्व शिक्षक-शिक्षकेतर वर्ग आणि संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन करण्याचे आवाहन संघटनेचे कार्यवाह राजेंद्र नखाते यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 1:07 am

Web Title: private primary school teachers deprived from wages
Next Stories
1 घराच्या वादातून मुलाकडून पित्याचा खून
2 संजय खोब्रागडेला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने जाळल्याचे उघड
3 नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पात मुबलक जलसाठा
Just Now!
X