27 November 2020

News Flash

चोरटय़ांकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त

शहरातील नाईकनगर भागात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उशिरा का होईना दोन चोरटय़ांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी

| June 23, 2013 01:40 am

शहरातील नाईकनगर भागात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उशिरा का होईना दोन चोरटय़ांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला. या आरोपींकडून इतर ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी व्यक्त केली.
नाईकनगर येथील उत्तमराव नानवटे, अनुपकुमार प्रसाद, शिवाजीनगर मधील हेमंत कुलकर्णी, उद्धवराव गायकवाड यांच्यासह शहरात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या. काहींनी तक्रारी दिल्या, तर काहींनी तक्रारी देण्याचे टाळले. वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. रूपसिंग टाक याने तयार केलेल्या ड्रेनेजवरील टीनशेडमधून पोलिसांनी ३ एलसीडी टीव्ही, ३ इन्व्हर्टर बॅटऱ्या, सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला. आरोपी टाक व त्याच्या साथीदाराने नाईकनगर भागातील चोऱ्यांची कबुली दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 1:40 am

Web Title: property seized of 1 25 lakh by thieft
Next Stories
1 शिपायांच्या ७४ जागांसाठी बीडमध्ये १३ हजार इच्छुक
2 हिंगोलीतून निवडणुकीसाठी अॅड. जाधव यांची चाचपणी
3 पुतळ्यांना निधी देण्याबाबत समिती नेमून निर्णय- ओझा
Just Now!
X