07 July 2020

News Flash

माध्यमिक शिक्षक सहकारी संस्थेत नोकर भरतीस विरोध

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी संस्थेकडून नोकरभरती करण्यात येणार असल्यास या भरतीला आपला विरोध असल्याचे

| October 29, 2013 07:35 am

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी संस्थेकडून नोकरभरती करण्यात येणार असल्यास या भरतीला आपला विरोध असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांना पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
सध्याच्या युगात संगणकीकरणावर भर देऊन अनावश्यक नोकर कपात करण्याचे धोरण सर्व बँका, सहकारी संस्था, पतसंस्था यांच्याकडून राबविण्यात येत आहे. मात्र आपल्या संस्थेने संगणकीकरणाकडे दुर्लक्ष करून शाखा सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. स्वहितासाठी नोकर भरतीचा घाट घातला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नवीन शाखांमुळे तेथील शाखा भाडे, साहित्य, संगणक, वीज देयक, दूरध्वनी देयक असा खर्च वाढतो. सभासद व जनहित सोडून स्वहितासाठी करण्यात येणाऱ्या नोकर भरतीमुळे संस्थेच्या लाभांश व ठेवीवरील व्याजावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होऊन सभासदांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन नोकर भरतीस विरोध असल्याचे म्हटले आहे.
प्रकाश सोनवणे यांनी, वेळोवेळी मासिक सभांमध्ये नोकर भरती करू नये हा मुद्दा मांडला आहे. पाच ऑगस्ट २०१२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि २५ ऑगस्ट २०१३ रोजी चांदवड येथे झालेल्या वार्षिक सभेत मनसे शिक्षक सेनेने शाखा विस्तारासही विरोध केला. निवेदन देताना प्रा. पुरुषोत्तम रकिबे, प्रकाश वाघ, दशरथ जारस आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2013 7:35 am

Web Title: protest against servants recruitment in secondary teacher co operative society
Next Stories
1 प्रमाणपत्र नोंदणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाचपट दंड
2 मोदी व अडवाणींवर काँग्रेसच्या सहप्रभारींचा हल्लाबोल
3 पारगमन शुल्काच्या वादावर आता सर्वसाधारण सभेत तोडगा
Just Now!
X