News Flash

थकीत वेतनप्रश्नी प्रजासत्तादिनी मंत्रालयासमोर निदर्शने करणार

नगरपरिषद मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांचे, सफाई कामगारांचे ६-७ महिन्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली

| January 22, 2013 12:52 pm

नगरपरिषद मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांचे, सफाई कामगारांचे ६-७ महिन्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच्या निषेधार्थ प्रजासत्ताकदिनी मंत्रालयापुढे  काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा प्रदीप औरसमल यांनी दिला.
बीड नगरपरिषदेच्या मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांचे, सफाई कामगारांचे ६-७ महिन्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नाही. तसेच वेतनातून कपात केलेले विम्याचे हप्ते व कर्जाचे पेमेंट संबंधित बँक आणि कार्यालयात पाठविले नाही.
मलेरिया कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आलेला ३ कोटी २५ लाख निधी नगरपरिषदेने विकासकामांवर खर्च केला. यास जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्याचा इशारा नगर परिषद कर्मचाऱ्याचा मुलगा प्रदीप औरसमल याने पत्रकाद्वारे दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:52 pm

Web Title: protest at mantralaya for balance salary on republic day
टॅग : Mantralaya,Protest
Next Stories
1 दुष्काळाची ‘उलटी पट्टी’!
2 शिवसेनेचा जालना मेळावा
3 ‘स्पर्धेतला घोडा बनून धावल्यास जगण्यातील आनंद हरवतो’
Just Now!
X