पब्लिक फाऊंडेशन या संस्थेने नागपूर जिल्ह्य़ातील एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे एक हजार विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, या तत्वज्ञानाला अनुसरून पब्लिक फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी निर्गुणशा ठमके हे या संस्थेचे कार्याध्यक्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक मदत देण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण मिळावे यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवते. परंतु त्या उपक्रमाचा लाभ तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना मिळतच नाही. त्यामुळे गरीब मुले शिक्षणात मागे राहतात. त्यामुळे पुढे अनेक संधीपासून ते मुकतात. ही स्थिती त्यांच्यावर येऊ नये, त्यांचाही शैक्षणिक विकास व्हावा, या हेतूने हे पाऊल टाकण्यात येत आहे.
यासाठी जिल्ह्य़ातील प्रत्येक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार आहे.
फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘शिक्षण दत्तक’ योजनाही राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबीर यासह अन्य शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी