निश्चित कालावधीत माहितीच्या अधिकारीखाली माहिती न दिल्याने हिंगणा तालुक्यातील सुकळी येथील तत्कालीन जनमाहिती अधिकारी व ग्रामसेवक लोकेश कोरडे यांना ८ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंडाची रक्कम कोरडे यांच्या मासिक वेतनातून कपात करून सरकारी तिजोरीत जमा करण्याचा आदेश राज्य माहिती आयुक्त व. प. पाटील यांनी दिला.
गावात झालेल्या ग्रामसभेमधील ठराव आणि संबंधित विषयाचा तपशील मिळण्याबाबत माहितीचा अधिकार हक्क मंचचे संस्थापक अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी ९ जानेवारी २०१३ ला कोरडे यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम अपीलिय अधिकारी यांच्याकडे ११ फेब्रुवारी २०१३ ला अपील केले. जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्जकर्त्यांला १० दिवसांत विनामूल्य देण्यात यावी माहिती आणि त्यासंदर्भातील अहवाल कार्यालयास सादर करावा, असा आदेश दिला. पंरतु कोरडे यांनी तब्बल ३२ दिवस विलंबाने माहिती सादर केली. यामुळे अर्जदाराने विलंबाने माहिती दिल्याबद्दल कोरडे यांच्यावर दंड लावण्याची अपिल प्रथम अपिलिय अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी मार्च अखेरीचे काम असल्याने माहिती देता आली नाही, असे कथन केले. त्याविरुद्ध अर्जदाराने राज्य माहिती आयोगाकडे धाव घेतली. त्यावर आयोगाने माहिती देण्यास विलंबाचे कोणतेही समाधानकारक उत्तर जनमाहिती अधिकाऱ्यांनी दिले नाही म्हणून विलंबाबात तत्कालीन जनमाहिती अधिकारी व ग्रामसेवक कोरडे यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (१) नुसार प्रतिदिवस २५० रुपये याप्रमाणे ३२ दिवसांसाठी ८ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश दिला. दंडाची रक्कम वसुलीची कारवाई प्रथम अपिलीय अधिकारी आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती हिंगणा यांनी करावयाची असून, दंड वसूल झाल्यानंतर अहवाल आयोगाकडे सादर करायचा आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
msrtc buses, Scrapped msrtc buses, Maharashtra ST Corporation, Scrapped buses, no data msrtc, good buses, bad buses, out of order buses, rti, maharashtra st, maharshtra buses, marathi news, maharashtra news,
धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा