रिक्षाचालक  व रिक्षा प्रवासी यांच्यामध्ये नेहमीच भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, मीटरप्रमाणे भाडे न घेणे आदी कारणांवरून शब्दिक चकमक होत असते. कधीकधी हीच शब्दिक चकमक हाणामारीपर्यंत देखील पोहचते. या कारणामुळे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षाचालकांच्या अरेरावीविरोधात तक्रार करण्यासाठी आरटीओने हेल्प लाइन सुरू केली आहे. पण या हेल्प लाइनला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. एप्रिल २०१३ पासून फेब्रुवारी २०१४ पर्यंत ७९ जणांनी फक्त हेल्प लाइनवरून तक्रार नोंदवली आहे. नवी मुंबई आरटीओने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांकडून १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे म्
एखादा रिक्षाचालक प्रवाशांशी हुज्ज्त घालत असेल तर रिक्षाचालकांच्या संघटनेचे पदाधिकारी प्रवाशांनाच वेठीस धरतात. पण रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कोणताही रिक्षा प्रवासी धजावत नसल्याने या रिक्षाचालकांचे फावले आहे. म् यासंदर्भात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे म्हणाले की, रिक्षाचालकांच्या उद्धट वर्तणुकीच्या तक्रारी या हेल्पलाइनवरून येत असतात. रिक्षाचालकांच्या विरोधात कोणी तक्रार नोंदविली असता त्या रिक्षाचालकांला नोटीस पाठवून बोलावून घेतले जाते. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केले जाते. तक्रार नोंदवण्यासाठी ९९६९८५४५५५ , १८००२२५३३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन धायगुडे यांनी केले आहे.