News Flash

इचलकरंजी शहरात ५० ठिकाणी शुद्ध जलप्रकल्प सुरू होणार

गतवर्षीच्या कावीळ साथीच्या पाश्र्वभूमीवर इचलकरंजी शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० ठिकाणी शुद्ध जलप्रकल्प सुरू केले जाणार असून, त्यासाठी १० कोटी

| April 26, 2013 01:04 am

गतवर्षीच्या कावीळ साथीच्या पाश्र्वभूमीवर इचलकरंजी शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० ठिकाणी शुद्ध जलप्रकल्प सुरू केले जाणार असून, त्यासाठी १० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय गुरुवारी इचलकरंजी नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये घेण्यात आला. या सभेवर विरोधी शहर विकास आघाडीने बहिष्कार टाकला होता.    
गतवर्षी कावीळ साथीमुळे शहर व परिसरात सुमारे ३० जणांचा बळी गेला होता. अशुद्ध पाण्यामुळे काविळीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर उपाययोजना म्हणून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी शेडय़ूल्ड बँकेने शहरात पाच ठिकाणी शुद्ध जल प्रकल्प सुरू केले आहेत. त्याला मिळणारा शहरवासीयांचा प्रतिसाद पाहता आणखी असे प्रकल्प होणे गरजेचे आहे. शहरात ५० ठिकाणी अशा प्रकारचे शुद्ध जल प्रकल्प सुरू करावेत अशी मागणी माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांच्याकडे केली होती.     
त्या आधारे गुरुवारी पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्य शासनाकडे १० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठवण्याचा एकमेव विषय सत्तारूढ गटाने मंजूर केला. तसेच नूतन नागरी बँक, नवमहाराष्ट्र सूतगिरणी, आयको सूतगिरणी यांनाही शुद्ध जल प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे सभेपूर्वी नगराध्यक्ष गोंदकर यांना आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्र पाठवून दहा ठिकाणी शुद्ध जल प्रकल्प सुरू करण्याची आपली तयारी असल्याचे कळविले होते. हा संदर्भ घेऊन सभेमध्ये काँग्रेसचे सदस्य शशांक बावचकर यांनी टीका केली. ते म्हणाले, एकीकडे हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली असलेली शहर विकास आघाडी शुद्ध जल प्रकल्पाच्या प्रस्तावामुळे विशेष सभेवर बहिष्कार टाकत आहे. तर दुसरीकडे आमदार हाळवणकर हे स्वत: शुद्ध जल प्रकल्प कार्यान्वित करण्याची तयारी दर्शवत आहेत. यातून आमदार हाळवणकर व आघाडीचे दुटप्पी धोरण दिसून येत आहे.
नगरपालिकेचे लेखापाल गोरडे यांना नगरसेवक तानाजी पोवार यांनी गेल्या आठवडय़ात श्रीमुखात लगावली होती. याबाबत पोवार यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी संभाजी काटकर, भीमराव अतिग्रे, बावचकर आदी सदस्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 1:04 am

Web Title: pure water project will start on 50 places in ichalkaranji
टॅग : Start
Next Stories
1 एल अ‍ॅन्ड टी कंपनीत घसघशीत पगारवाढ
2 जायकवाडीच्या पाण्यावर सरकारची सावध भूमिका
3 एएमटीचा केंद्र सरकारकडून गौरव
Just Now!
X