शहरातील हार्मनी कलादालनात ‘वसंत पोतदार की याद में मैफल’ संस्थेतर्फे आयोजित मैफलीत दिवंगत संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ४० गाणी सादर करण्यात आली.
मैफलीचे उद्घाटन उद्योजक अशोक कटारिया, माजी सैनिकी अधिकारी सुधाकर पुंड, प्रदीप गाडगीळ, प्रा. बाळ नगरकर, राजा पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उषा पाटेकर, मुग्धा कुलकर्णी, विद्या कुलकर्णी, सतीश  कोठकर, निमाणी पाटेकर, जयंत पाटेकर यांनी गाणी सादर केली. निवेदन प्रीती जैन यांनी केले. साथसंगत किशोर पाटकर, जयंत पाटेकर, आनंद गायकवाड, सौरभ चित्रे यांनी केली. यापुढे संगीतकार नौशाद, रोशन तसेच दिग्दर्शक राजीव पाटील स्मृतीनिमित्त ‘जागर राजुचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राजा पाटेकर यांनी दिली आहे.