लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
लातूर शहरासह तालुक्यात मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने झोडपून काढले.
तालुक्याच्या काही ठिकाणी गारपीट झाली. ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह आंबा मोहोराचे यामुळे मोठे नुकसान झाले.
लातूर तालुक्यातील तांदुळजा, सारसा, चांडेश्वर गावांत सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाला. सुपारीएवढय़ा आकाराच्या गारा पडल्या. वादळी पाऊस व गारपिटीमुळे उभ्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.