काँग्रेस कार्यकर्त्यांव्दारे उमेदवारांची थेट निवड करण्याच्या अमेरिकन पध्दतीनुसार मतदान घेऊन उमेदवार निवडण्याच्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या योजनेत असलेला महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ रद्द करण्यात आल्याने काँॅग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांची या मतदारसंघात उमेदवारी जवळ जवळ निश्चित झाल्याची चर्चा आहे.
अमेरिकन पध्दतीनुसार मतदार घेऊन उमेदवार निवडीसाठी देशातील १५ लोकसभा मतदारसंघांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचा समावेश होता. मात्र, आता याऐवजी लातूर आणि वर्धा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, या पध्दतीला काँॅग्रेसमध्येच विरोधाचा सूर उमटला आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तर आपल्याला डावलण्यासाठीच यवतमाळ-वाशीम मतदारसंघाची निवड केल्याचा आरोप केला होता, तर या पध्दतीने पक्षांतर्गत गटबाजी उफाळेल, अशाही तक्रारी झाल्या होत्या. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी आमदार  संदीप बाजोरिया, प्रवीण देशमुख, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष नाना गाडबले यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांना लढवण्याची तयारीही नेत्यांनी केली होती. मात्र, कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देणार नाही, ही कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भूमिका प्रबळ ठरून राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, कॉंग्रेसनेही कार्यकत्यार्ंमधून थेट उमेदवार निवडीची पध्दत या मतदारसंघासाठी बाद केली आहे. त्यामुळे आता काँॅग्रेसची उमेदवारी कुणाला, हा प्रश्न चच्रेत असतांना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
उमेदवारीसाठी खुद्द माणिकराव ठाकरे, मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी खासदार हरिभाऊ राठोड, अखिल भारतीय महिला काँॅग्रेसच्या पदाधिकारी संध्या सव्वालाखे स्पध्रेत असून प्रत्येकाने पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीचा दावा केल्याचेही वृत्त आहे. काँॅग्रेसने मतदारसंघातील तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचे आयोजन केले असून
प्रतिनिधी, नागपूर
महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान नागपूर महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर महापालिका कलावंतांवर ८३ लाख ९७ हजार २२४ रुपये खर्च करणार आहे. विकास कामांसाठी पैशाची चणचण असताना महापालिका मनोरंजनावर उधळपट्टी करणार आहे.
नागपूर महोत्सव कार्यक्रमाचा दर्जा कायम राहावा आणि उत्कृष्ट सादरीकरण व्हावे यादृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रमासंबंधी निविदा काढण्यात आल्यानंतर त्यात कन्टेन्ट कम्युनिकेशन आणि अ‍ॅडमार्क इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांना केवळ कलावंत ठरविण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. नागपूर महोत्सवात शास्त्रीय गायिका शुभा मुदगल, श्रेया घोषालसह दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर झळकणारे कलावंत आणि स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संस्थांना कुठलाही कार्यक्रम आयोजित करताना कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न असतो. मानधनावरून कलावंत कुठले निमंत्रित करायचे यावर अनेक संस्थांचे कार्यक्रम ठरविले जातात, नागपूर महोत्सवात शुभा मुदगल यांचा फ्यूजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्या कार्यक्रमावर १५ लाख १६ हजार ८६० रुपये तर श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमावर ३२ लाख ४७ हजार २०४ रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुदगल आणि घोषाल यांच्यासोबत येणारा वाद्यवृंद हा स्थानिक आहे की तो मुंबईवरून येणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. स्थानिक कलावंतांचा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यावर १२ लाख ३५ हजार ९६० रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक गायक, वादक असा २५ ते २७ लोकांचा समूह असल्याची माहिती मिळाली आहे. दूरदर्शनवरील विविध ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून समोर आलेले अनेक नवोदित कलावंत आणि काही मराठी रंगभूमीवरील मराठी कलावंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्व कलाकारांवर १७ लाख ९७ हजार ७६० रुपये खर्च करण्यात येणार आहे.
हिंदी कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यात सुनील जोशी, पूनम वर्षां, गोविंद राठोड, विनीत चव्हाण आदी मान्यवर कवी सहभागी होणार असून त्यांच्या मानधनावर ५ लाख ९४ हजार ४४० रुपये खर्च करण्यात येणार आहे. या शिवाय मंडप, सजावट व्यवस्थेसह अन्य खर्च या महोत्सवात करण्यात येणार आहे. कलावंतांच्या वाढत्या मानधनामुळे अनेक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना चांगले कलावंत आमंत्रित करता येत नसल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद नागपूरकर रसिकांना घेता येत नव्हता. मात्र, महापालिकेने अशा ‘महाग’ कलावंतांना आमंत्रित करून त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी रसिकांना उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, एकीकडे स्थानिक स्वराज्य करामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना विकास कामे रखडली आहे तर दुसरीकडे केवळ कलावंतांच्या मानधनावर लाखो रुपये खर्च केले जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मेळाव्यातील मार्गदर्शनाचा अन्वयार्थ ‘राहुल ठाकरे यांना उमेदवारी’ असाच लावला जात आहे. राहुल ठाकरे यांनीही जनसंपर्क मोहीम धडाक्याने सुरू केली आहे. सेना-भाजपतर्फे विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या सेनेच्या खासदार भावना गवळी यांनी चौथ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी पदर खोचून तयारी केली आहे.
नागपूर महोत्सवासाठी मात्र ८४ लाखांचा खर्च विकासकामांसाठी निधीची चणचण..