01 March 2021

News Flash

गडचिरोलीत जुगार अड्डय़ावर छापा, ३ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांना पकडले

येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जवाहर भवनात जुगार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ३ पोलिसांसह ८ शासकीय कर्मचाऱ्यांना मुद्देमालासह पकडले.

| June 20, 2013 08:34 am

येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जवाहर भवनात जुगार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ३ पोलिसांसह ८ शासकीय कर्मचाऱ्यांना मुद्देमालासह पकडले.
येथील जिल्हा परिषद कार्यालयामागे जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी जवाहर भवन बांधण्यात आले आहे. मात्र, या जवाहर भवनाचा दुरुपयोग होत असून त्या ठिकाणी अनेक शासकीय कर्मचारी जुगार खेळत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली.  
गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी खाडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार बोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जवाहर भवनावर धाड टाकली असता ३ पोलीस कर्मचारी आणि अन्य ५ शासकीय कर्मचारी जुगार खेळताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्या जवळील ५६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पकडले. या घटनेतील सहभागी आरोपींची नावे सांगण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2013 8:34 am

Web Title: raid on gambling spot in gadchiroli
टॅग : Gadchiroli,Loksatta,News
Next Stories
1 औषध विक्रेत्यांच्या निर्णयाने आयुक्तांवरच ‘ब्लॅक लिस्ट’ होण्याची वेळ – नावंदर
2 विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
3 चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
Just Now!
X