दीर्घ प्रतीक्षेनंतर ठाणेकरांच्या सोयीसाठी गेल्या ऑगस्ट महिन्यात तिसरा पादचारी पूल घाईघाईने वाहतुकीसाठी खुला केला. मात्र या पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेले फलाटांवरील पत्रे अद्याप टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना उन्हा-पावसात लोकलची वाट पाहावी लागते. आता दोन-तीन दिवसांपूर्वी खासदार संजीव नाईक आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी ठाणे स्थानकाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी निधी मिळत नसल्याने स्थानकातील विकास कामात अडथळे येत असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात या स्थानकात सरकत्या जिन्यांचे काम सुरू होईल, असा दिलासाही त्यांनी दिला. वस्तुस्थिती मात्र अशी दिसते की, सरकते जिने प्रत्यक्षात येतील तेव्हा येतील पण फलाटावरील काढलेले पत्रे तरी पुन्हा टाकून ऊन-पावसापासून प्रवाशांना दिलासा द्यावा. सर्वसामान्य प्रवाशांची सध्या तरी एवढीच प्रवाशांची माफक अपेक्षा आहे..