गुरुवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गाडय़ांचा अंदाज घेण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर सुरुवातीला काही वेळ चर्चा होऊ लागल्या. पण त्यानंतर मात्र पावसाचे विनोद, मेसेज यांनी या वॉल्स ओसंडून वाहू लागल्या. ट्विटरवरसुद्धा #mumbairains ट्रेंड दिवसभर गाजत होता.

१) जगातलं सर्वात मोठं वॉटरपार्क खुलं झालंय, ‘मुंबईका’. आपले स्विमजॅकेट घेऊन बाहेर पडा.
२) ये रे ये रे म्हटल्यावर इतकं यायचं.. काहीही हां पाऊस.
३) आज समुद्रात सर्वात मोठी भरती आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या. wwwअरबीसमुद.com
४) आज मुंबईमध्ये केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरच लोक कामावर आहेत.
५) कृपया ट्रेन सुरू झाल्याच्या आणि त्यामुळे कोणाला दु:ख मिळेल अशा बातम्या टाकू नका.
६) पावसाने घातला राडा.. चला पेले काढा
७) जे ऑफिसच्या जवळ राहतात त्यांच्यासाठी एक मिनिट शांतता पाळा.
८) मुंबईकरांना सल्ला.. आज पिझ्झा मागवा. तीस मिनिटांत येणार नाही. हमखास मोफत मिळेल.
९) भारताने पाण्यावर धावणारी ट्रेन काढली हे पाहून जग घाबरलं.
१०) आज राहुल गांधीचा वाढदिवस आहे म्हणून आकाशालाही रडू आलं.
११) तुमच्याकडे बोट असेल तरच घराबाहेर पडा.

मालिकांचे चित्रीकरण लांबले
एरवी सकाळी सातला सेटवर हजर राहणारी कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी शुक्रवारी पावसामुळे रस्त्यामध्ये अडकून पडली होती. मालाड, मढ, गोरेगाव येथे मालिकांचे सेट असतात. कलाकारही साधारणपणे त्याच भागात राहात असले, तरी रस्तेच पाण्याने भरल्यामुळे त्यांना सेटवर पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे सकाळी सातला सुरू होणारे चित्रीकरण सुरळीतपणे सुरू होण्यासाठी दुपारचे बारा वाजले.