News Flash

बासरीच्या सुरांची बरसात..!

येथील गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडलेल्या दोन दिवसीय बासरी उत्सवात रसिकांनी बासरीच्या सुरांची बरसात अनुभविली. प्रतिष्ठानच्या या सहाव्या बासरी महोत्सवात यंदा

| January 22, 2013 12:31 pm

येथील गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडलेल्या दोन दिवसीय बासरी उत्सवात रसिकांनी बासरीच्या सुरांची बरसात अनुभविली. प्रतिष्ठानच्या या सहाव्या बासरी महोत्सवात यंदा विख्यात बासरीवादक पद्मश्री डॉ. एन. रामाणी यांना पहिला पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दस्तुरखुद्द त्यांच्या हस्तेच करण्यात आले. प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह आणि रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विवेक सोनार यांनी की बोर्ड, सेक्साफोन, ट्रम्पेट, ड्रम, तबला, पखवाज आणि गिटार या वाद्यांच्या साथीने बासरीवादन सादर केले. शनिवारी अखेरच्या सत्रात पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर पं. कुमार बोस यांनी, तर भवानी शंकर यांनी पखवाजवर साथ केली.  बासरीवादनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत गुरुकुल प्रतिष्ठानचे हरिप्रसाद चौरसिया यांनी कौतुक केले. दुसऱ्या दिवशी गुरुकुल प्रतिष्ठानच्या विविध वयोगटांतील ८० विद्यार्थ्यांनी विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली समूह बासरीवादन सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:31 pm

Web Title: rain of flute sur
टॅग : Flute
Next Stories
1 वरच्या स्तराचे मराठीशी नाते तुटले – नायगांवकर
2 कल्याण-डोंबिवलीत २३ मार्गावर परिवहन सुविधा
3 जागेच्या वादातून बाप-लेकीस मारहाण
Just Now!
X