पावसाळा मुंबईसाठी ‘खास’च असतो. हंगामात ४-६ वेळा अतिवृष्टीमुळे गाडय़ा बंद पडल्या नाहीत, ‘नेहमी’च्या ठिकाणी कंबरभर पाणी साचले नाही, दरडी कोसळल्या नाहीत तर मुंबईकरांना पाऊस नेहमीसारखा झाल्याचे बहुधा वाटतच नाही. मात्र पाणी साठणे, दरडी कोसळणे आदींचा फटका ज्यांना बसतो त्यांना खरोखर देव आठवतो. यंदा पालिकेने शहर आणि उपनगरांत नेहमी पाणी साठणाऱ्या जागा निश्चित केल्या असून साठलेले पाणी त्वरित उपसण्यासाठी पंप बसविण्यासारख्या उपाययोजनाही केल्या आहेत. अशा १८५ ठिकाणी २२० पंप बसविण्यात येत आहेत. तसेच दरडी कोसळू शकतील अशी २६३ ठिकाणे शोधण्यात आली असून त्या परिसरातील नागरिकांना त्याची माहिती देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेची सर्व विभागीय कार्यालये ‘हॉट लाइन’मार्फत मध्यवर्ती आपत्कालीन विभागाशी जोडण्यात येत आहेत. तसेच १६० अग्निशम अधिकारी आणि जवानांचा समावेश असलेली ६ पथके, ८४ जीवरक्षक, ६ बचावनौका, १२ कयाक्स, नौदलाची पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईत पाणी साचणारी ४० ठिकाणे
शहर
‘बी’ विभाग – एस. व्ही. पी. लो लेव्हल, सॅन्डहर्स्ट रोड; ‘डी’ – मुंबई सेंट्रल, स्लॅटर रोड; ‘ई’ – बुऱ्हानी कॉलेज, मराठा मंदिर; एफ-दक्षिण – हिंदमाता; एफ-उत्तर – किंग्ज सर्कल, वडाळा स्थानक; जी-दक्षिण – सखुबाई मोहिते मार्ग.

पश्चिम उपनगरे
‘एच-पश्चिम’ – जुहू तारा रोड आणि एस. व्ही. रोड जंक्शन – सांताक्रूझ (प.), मिलन सबवे – सांताक्रूझ (प.), गझदर बंध – सांताक्रूझ (प.); ‘के-पूर्व’ – भोगले चौक, विलेपार्ले (पू.), एम. जी. रोड जंक्शन, सुभाष रोड, विलेपार्ले (पू.); ‘के-पश्चिम’ – अंधेरी बसवे, मरोळ मार्केट, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (प.), विद्यानिधी संकुल, जेव्हीपीडी उत्तर, विलेपार्ले (प.), वीरा देसाई रोड, शेवटचा बस थांबा, अंधेरी (प.); ‘पी-दक्षिण’ – कोटकर नाला, गोरेगाव (पू.), पिरामल नगर नाला, गोरेगाव (प.); ‘पी-उत्तर’ – राणी सती मार्ग, मकरानी पाडा, मालाड (पू.), लिंक रोड, गौरी पाडा, मालाड (प.), मालाड बसवे, मालाड (पूर्व आणि पश्चिम); ‘आर-उत्तर’ – संभाजीनगर, दहिसर (पू.), दहिसर बसवे, दहिसर (पूर्व आणि पश्चिम); ‘आर-दक्षिण’ – वलनई वसाहत, कांदिवली (प.), कांदिवली फायर स्थानक समोर, एस. व्ही. रोड, कांदिवली (प.).

पूर्व उपनगरे
‘एल’ – कुर्ला स्थानक (प.), रिक्षा तळाजवळ, एल. बी. एस. मार्ग, सी.एस.टी. जंक्शन ते शीतल सिनेमा, कुर्ला (प.), प्रीमियर रोडपासून मिलिंदनगर नाल्यापर्यंत; ‘एम-पूर्व’ – शांतीनगर, बैगनवाडी; एम-पश्चिम – सिंधी सोसायटी, चेंबूर (प.), सुभाष रोड आमि रोड नंबर २१ मध्ये, जिवनबहार सोसायटी, चेंबूर (प.), संत जोग मार्ग, टिळक मार्ग, चेंबूर (प.), सावन बाझार, एन. जी. आचार्य मार्ग, चेंबूर (प.); ‘एन’ – किरोल रोड, फातिमा हायस्कूलजवळ, घाटकोपर (प.), न्यू पंतनगर ते वल्लभ बाग विस्तारीत, रेल्वे पोलीस वसाहतीपर्यंत, घाटकोपर (पू.), नेव्हल हॉकयार्ड, एल. बी. एस. रोड, जंक्शन चिराग नगर रोड, घाटकोपर (प.); ‘एस’ – भांडूप व्हिलेज रोड, प्रोग्रेसिव्ह स्टिल कंपनी, भांडूप (प.)