अखेर महापालिकेची सत्ता पुन्हा आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीकडेच राहणार हे निश्चित झाले असून शहराच्या दहाव्या महापौर म्हणून आघाडीच्या राखी सोनवणे व उपमहापौर म्हणून सुनील महाजन यांच्या निवडीवर शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. दोन्ही पदांसाठी आघाडीच्या या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे.

महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी, मनसे यांनी तटस्थतेची भूमिका जाहीर केल्यामुळे खान्देश विकास आघाडीचाच महापौर होणे निश्चित झाले होते. महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची १६ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती.
आघाडीकडून राखी सोनवणे, माजी उपमहापौर भारती सोनवणे यांसह वर्षां खडके यांचे नाव चर्चेत होते. त्यात राखी सोनवणे यांच्या बाजूने नेतृत्वाने कौल दिला.
७५ सदस्यांच्या महापालिकेत सर्वाधिक ३३ जागा खान्देश विकासकडे असल्या तरी बहुमतासाठी आवश्यक ३८ संख्या गाठणे त्यांना जमले नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या ११, मनसेच्या १२ सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे खान्देश विकासचा सत्ता कायम राखण्याचा मार्ग मोकळा झाला. जनक्रांतीच्या दोघांनी तसेच एका अपक्षाने खान्देश विकासला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे संख्याबळ ३६ झाले आहे.
दरम्यान, खान्देश विकास आघाडीने राखी सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी आघाडीचे सहकारी शहर विकास आघाडीचे नेते कैलास सोनवणे हे नाराज असल्याची चर्चा आहे. २००८ च्या निवडणुकीत कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वातील शहर विकास आघाडीने आठ जागा जिंकून उपमहापौरपद मिळविले होते. त्यानंतर त्यांनी आपली आघाडीच खान्देश विकासमध्ये विलीन केली. महापौरपदासाठी आपली पत्नी भारती सोनवणे यांचा ज्येष्ठतेनुसार विचार करावा असे कैलास सोनवणे यांचे म्हणणे होते. पण त्यांचा विचारच न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट