21 September 2020

News Flash

पुतळा विटंबना प्रकरणी देऊळगावराजात मोर्चा

जालना जिल्ह्य़ातील शेवली येथे शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात राष्ट्रद्रोही समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेची महाराष्ट्र शासनाने

| January 24, 2014 08:07 am

जालना जिल्ह्य़ातील शेवली येथे शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात राष्ट्रद्रोही समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेची महाराष्ट्र शासनाने त्वरित दखल घेऊन त्या समाजकंटकांना अटक करून कठोर शासन करावे, भविष्यात कोणत्याही थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्याची हिंमत होणार नाही, अशा आशयाचे निवेदन काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी संपूर्ण देऊळगावराजा शहर बंद पुकारण्यात आला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मुख्य मार्गाने आंबेडकरी विचाराच्या सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व महिला या मोर्चात सहभागी झाले होते.
याप्रसंगी घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. मोर्चात गौतम कासारे, नगरसेविका रेखा कासारे, नाना कासारे, अतिश कासारे, दीपक कासारे, दिलीप खरात, अब्दुल हफीज आदिंची उपस्थिती होती. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 8:07 am

Web Title: rally in deulgaonraja
टॅग Buldhana,Rally
Next Stories
1 संतप्त जमावाकडून आरोपीची हत्या
2 मारहाणीचा वचपा घेण्यासाठीच जमावाने मोहनीशला संपविले!
3 देशात सर्वत्र आर्थिक लूट – कॉ. तपन सेन
Just Now!
X