News Flash

मधुमेहदिनानिमित्त लातूर शहरात रॅली

जागतिक मधुमेहदिनानिमित्त मधुमेहतज्ज्ञांच्या पुढाकाराने शहरात गुरुवारी जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली.

| November 15, 2013 01:52 am

जागतिक मधुमेहदिनानिमित्त मधुमेहतज्ज्ञांच्या पुढाकाराने शहरात गुरुवारी जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली.
गांधी चौकात सकाळी गोपीकिशन भराडिया, ईश्वर राठोड, हमीद चौधरी, परमेश्वर सूर्यवंशी, गजानन गोंधळी, रायभोगे आदी डॉक्टरांच्या पुढाकाराने वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, परिचारिका, औषध विक्रेते आदींचा सहभाग असलेली रॅली काढण्यात आली. देशात प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक मधुमेहाने पीडित आहे. शारीरिक श्रम करा, दुचाकीऐवजी सायकलचा वापर करा, संतुलित आहार घ्या असे फलक रॅलीतील सहभागींच्या हातात होते. रविवारी (दि. १७) मधुमेह संदेश या विषयावर दयानंदच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत गांधी चौकात मोफत मधुमेह चाचणी डॉक्टरांच्या पुढाकाराने करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 1:52 am

Web Title: rally in latur city due to diabetes
टॅग : City,Latur,Rally
Next Stories
1 हिंगोलीतील तीन गावांत रेतीघाट लिलावास विरोध
2 भ्रष्ट सरकार सत्तेवरून खाली खेचा- कराड
3 झेरॉक्स सेंटरवर छाप्यात तीन लाखांचा ऐवज जप्त
Just Now!
X