गंगाखेड पालिकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रामप्रभू मुंढे यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या विरोधात एकवटलेल्या ‘गंगाखेड पॅटर्न’ने पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवली. पॅटर्नला छेद देण्याचे डॉ. केंद्रे यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले.
राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आमदार घनदाट मित्रमंडळ असे सर्व घटक एकत्र आल्यानंतर गंगाखेड पॅटर्न हे नवे समीकरण रुढ झाले. डॉ. केंद्रे यांना सत्तेपासून रोखण्यासाठी अस्तित्वात आलेल्या पॅटर्नने सव्वा वर्षांपूर्वी काँग्रेसच्या अलका चौधरी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली. सव्वा वर्ष नगराध्यक्षपद काँग्रेसकडे व पुढचे सव्वा वर्ष भाजपच्या श्रीराम मुंढे यांच्याकडे राहील, असा करार होता. त्यानुसार चौधरी यांनी राजीनामा दिला. रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. या निवड प्रक्रियेकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखणाऱ्या गंगाखेड पॅटर्नचा विजय होतो की, डॉ. केंद्रे काही चमत्कार घडवतात, या बाबत कमालीची उत्सुकता होती. प्रत्यक्षात नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी डॉ. केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक बैठकीस अनुपस्थित राहिले. डॉ. केंद्रे यांच्या वतीने शेख अफजलोद्दीन राजा यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज होता. काँग्रेस, भाजप, शिवसेना व घनदाट मित्रमंडळाचे सर्व सदस्य नगराध्यक्ष निवडीच्या बैठकीस उपस्थित होते. अपक्ष अ‍ॅड. सुप्रिया मुंढे याही उपस्थित होत्या. या सर्व १३ नगरसेवकांनी भाजपच्या मुंढे यांना मतदान केले. राष्ट्रवादीने बैठकीकडे पाठ फिरवली. शेवटच्या क्षणापर्यंत नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे मिळवण्यासंदर्भात डॉ. केंद्रे यांचे प्रयत्न सुरू होते. ते यशस्वी झाले नाहीत व गंगाखेड पॅटर्नच्या एकजुटीला त्यांना सुरुंग लावता आला नाही. निवडणूक प्रक्रियेत उपजिल्हाधिकारी धरमकर, तहसीलदार प्रतीक्षा गोरे, मुख्याधिकारी गणेश चव्हाण आदींसह कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पाहिले. नगराध्यक्ष निवड बैठकीदरम्यान पोलीस बंदोबस्त मोठा होता.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Chandrashekhar Bawankule
औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी