अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व अशोकभाऊ फिरोदिया मेरिट फाऊंडेशन आयोजित स्व. अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक शालेय क्रिकेट स्पर्धेत आज श्रीरामपूरच्या रामराव आदिक इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल संघाने विजेतेपद पटकावले. अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यानंतर लगेचच प्रसिद्ध क्रिकेटपटू अभिजित काळे याच्या हस्ते विजयी संघ व खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले.
फिरोदिया शाळेच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आदिक स्कूलच्या संघाने २० षटकांत ९ गडय़ांच्या मोबदल्यात १४९ धावा जमवल्या. त्याला प्रत्युत्तर देताना फिरोदिया संघाच्या २० षटकांत सर्वबाद ६९ धावा झाल्या. ४५ धावांत ४ गडी टिपणारा आदिक संघाचा गोलंदाज सामनावीर ठरला. प्रथमेश वने (फिरोदिया संघ, उत्कृष्ट खेळाडू ६ सामन्यात १२७ धावा व ९ बळी), अभिषेक कासार (उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, समर्थ शाळा), विशाल रोकडे (आदिक संघ, ६ सामन्यात २०१ धावा, उत्कृष्ट फलंदाज), सूरज काळे (६ सामन्यात १३ बळी, उत्कृष्ट गोलंदाज), संकेत गिरी (उत्कृष्ट यष्टिरक्षक, पाऊलबुद्धे शाळा). विजेता संघास रोख ५ हजार १ रु. व उपविजेते संघास ३ हजार १ रु.चे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून रोहित खान, इम्रान अन्सारी, यश कासलीवाल यांनी काम पाहिले.
स्पर्धेत एकूण १६ शाळांचे संघ सहभागी झाले होते. जिल्हास्तरावर चांगले खेळाडू तयार होण्यासाठी अशा शालेय स्पर्धाचे सतत आयोजन केले गेले पाहिजे, त्यातूनच पुढे रणजीपटू तयार होतील, खेळाडूंनी खेळ व मार्गदर्शक यांच्याबद्दल आदर ठेवावा, असे अभिजित काळे याने या वेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव प्रा. माणिक विधाते होते.
संघटनेचे सचिव संजय बोरा, गौरव फिरोदिया, कल्याणी फिरोदिया, शरद रच्चा, धनंजय देशपांडे, प्राचार्य प्रवीण कवडे, राजीव सेटिया, वसंतराव गुंजाळ आदी  या वेळी उपस्थित होते. पारुनाथ ढोकळे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य नंदकिशोर भावसार यांनी आभार मानले.

CSK vs KKR Highlights Cricket Score in Marathi
IPL 2024 CSK vs KKR Highlights: ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेचा शानदार विजय, केकेआरवर ७ विकेट्सनी केली मात
mahendra singh dhoni
IPL 2024 DC vs CSK: खलीलने रचिला पाया, मुकेशने चढविला कळस, दिल्लीचा चेन्नईवर २० धावांनी विजय
Kwena Mafaka IPL Debut
IPL 2024 : कोण आहे १७ वर्षीय क्वेना माफाका? मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरताच रचला इतिहास
Rohit Sharma gifted special 200 jersey by Sachin Tendulkar
IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! सचिन तेंडुलकरकडून मिळालं खास गिफ्ट