24 January 2020

News Flash

अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऐरोली येथे एक आठ वर्षीय मुलीला अश्लील चित्रफीत दाखून तरुणाने बलात्कार केला असल्याचा घृणास्पद प्रकार सोमवारी संध्याकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने

| July 23, 2014 07:06 am

ऐरोली येथे एक आठ वर्षीय मुलीला अश्लील चित्रफीत दाखून तरुणाने बलात्कार केला असल्याचा घृणास्पद प्रकार सोमवारी संध्याकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी अक्षय अरुण पवार या तरुणाला अटक केली आहे.  तो ऐरोली सेक्टर ४ येथील राहणारा आहे.
पीडित मुलगी तळवली नाका येथे राहणारी आहे. सोमवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर ती घरी येत असताना अक्षय याने तिला गाठले. तिचे वडील त्याच्याच घरी असून त्यांच्या बरोबर घरी जा अशी थाप त्याने तिला मारली. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या लॅपटॉपमध्ये असलेली अश्लील चित्रफीत दाखवत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी बलात्कार आणि प्रोटेक्शन ऑफ ऑफेन्सेस चिल्ड्रेन सेक्स्युल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

First Published on July 23, 2014 7:06 am

Web Title: rape on minor girl in navi mumbai
Next Stories
1 एमजीएम रुग्णालयात सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन
2 उपायुक्तांच्या आदेशानंतरही दास्तान दिघोडे रस्त्यावरील अवजड वाहतूक सुरूच
3 राजन विचारेंच्या विजयाला राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांचा हातभार
Just Now!
X