07 July 2020

News Flash

उरणमध्ये दुर्मीळ जातीचा मांडूळ साप आढळला

उरण तालुक्यातील चिर्ले परिसरातील वन्यजीव मित्र आनंद मढवी यांना मांडूळ (दुतोंडय़ा) हा दुर्मीळ जातीचा साप आढळून आला असून त्याची वन विभागाकडे नोंद करून

| October 28, 2014 06:54 am

उरण तालुक्यातील चिर्ले परिसरातील वन्यजीव मित्र आनंद मढवी यांना मांडूळ (दुतोंडय़ा) हा दुर्मीळ जातीचा साप आढळून आला असून त्याची वन विभागाकडे नोंद करून त्याला पुन्हा एकदा जंगलात सोडण्यात येणार आहे. या सापाची लांबी ४४.५ इंच इतकी असून यापूर्वी उरण विभागात ४५ इंचांचा साप सापडला होता.
मांडूळ जातीच्या सापाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. याच गैरसमजातून त्याचा मांत्रिकांकडून वापर केला जातो. त्यासाठी या सापाची तस्करीही केली जाते. त्यामुळे या सापाला लाखो रुपयांची किंमत आहे. साधारणत: मातीखाली राहणारी ही सापाची जात असून गांडूळ, किडे हे त्याचे प्रमुख अन्न आहे. त्याचप्रमाणे हा साप विदर्भातील भुसभुशीत मातीतच आढळतो.
मात्र तस्करीच्या निमित्ताने आणण्यात आलेले साप या भागात आढळून येत असल्याने या विभागात दुर्मीळ जातीच्या सापांची तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2014 6:54 am

Web Title: rare cast mandula snake found in uran
टॅग Uran
Next Stories
1 पनवेल एसटी पंपावरील डिझेल संपल्याने प्रवाशांचे हाल
2 सिडकोने डॉक्टर बदलूनही कचरा समस्या कायम
3 एनएमएमटीचे बसस्टॉप रिक्षाचालकांना आंदण
Just Now!
X