23 January 2021

News Flash

दुर्मीळ मासे बघायचेयत..

लौकिक क्रिएशनच्या वतीने २६ एप्रिल ते १ मे या कालावधीत ठाण्यातील घंटाळी मैदानात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ‘अ‍ॅक्वा लाइफ २०१३’ हे मत्स्य

| April 26, 2013 02:29 am

लौकिक क्रिएशनच्या वतीने २६ एप्रिल ते १ मे या कालावधीत ठाण्यातील घंटाळी मैदानात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ‘अ‍ॅक्वा लाइफ २०१३’ हे मत्स्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३०० हून अधिक दुर्मीळ माशांच्या प्रजाती मांडण्यात येणार असल्याने हे प्रदर्शन मत्स्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. एकूण २०० टँक्समध्ये पिऱ्हाना, ऑस्कर, कॅटफिश आणि डिस्कस यांसारखे मोठे मासे तसेच मोरील, बांगी, मोठय़ा चोचीचा कोरालफिश, डेन्ड्रोचायरस झेब्रा सी, फॉक्सफेस, ब्ल्यू ब्लॉच्ड् बटरफ्लाय, बबल फिश, स्कॅट फिश, बायकलर यांसारखे विविध माशांचे प्रकार या वेळी नागरिकांना पाहता येणार आहेत. येथे उभारण्यात येणाऱ्या एका मोठय़ा टँकमध्ये ५०० माशांच्या जाती मांडण्यात येणार आहेत. तसेच या प्रदर्शनाच्या माध्यमातून अ‍ॅक्व्ॉरियम तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि त्याचा वापर यांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ९०९६००३३०० / ९४०४६८३४०७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:29 am

Web Title: rare fishes exhibition
Next Stories
1 टिटवाळ्याला परप्रांतीयांचा विळखा!
2 रिक्षाचालकांची मानसिकता बदलण्यासाठी..
3 सिडको पुढील महिन्यात प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष धोरण ठरविणार
Just Now!
X