स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल दरोडय़ाचे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी गुरुवारी गंगाखेड रस्त्यावरील िपगळगढ नाल्यावर संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.
दाखल गुन्हे मागे घ्या, तसेच कापूस उत्पादकांना मदत जाहीर करा, खोटे गुन्हे नोंदविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, या मागण्यांसाठी दुपारी १२ वाजता िपगळगढ नाल्यावर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष माणिक कदम, दिगंबर पवार, त्र्यंबक िशदे, बाळासाहेब कदम, शेख आयुब, मो. तकी, माउली कदम आदींचा यात सहभाग होता. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक बंद पडली होती. पाथरी येथेही विविध मागण्यांसाठी संघटनेने आंदोलन केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 1:50 am