News Flash

सीताबर्डी किल्ला जलकुंभाची पुनर्बाधणी सुरू

मध्य नागपूचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी नागपूर महापालिका व ओसीडब्ल्यूने सीताबर्डी किल्ला येथील जलकुंभाच्या पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

| August 29, 2014 01:05 am

मध्य नागपूचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी नागपूर महापालिका व ओसीडब्ल्यूने सीताबर्डी किल्ला येथील जलकुंभाच्या पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. महापौर अनिल सोले, जलप्रदाय समिती अध्यक्ष सुधाकरराव कोहळे व एनईएसएलचे संचालक प्रवीण दटके यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
सध्या सेमिनरी हिल्स येथील एमबीआरएसप्रमाणेच सीताबर्डी किल्ला येथेही फोर्ट १ व फोर्ट २ असे दोन जलकुंभ आहेत. या जलकुंभातून मुख्यत्वे शहराच्या मध्य भागाला पाणीपुरवठा होतो. या अतिशय जुन्या जलकुंभापैकी किल्ला २ हे जलकुंभ पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्याच जागी नवीन जलकुंभ बांधण्यात येतील. पोर्ट २ जलकुंभ जवळजवळ ५० वषार्ंपूर्वी बांधण्यात आले होते. तेव्हापासून त्याची डागडूजी झाली नाही. या कामामध्ये सीताबर्डी किल्ल्याच्या दोन टाक्याचे विलगीकरण करणे, या नवीन व्यवस्थेत पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नवीन व्हॉल्व बसवणे व पाण्याच्या मोजमापासाठी फ्लो मीटर बसवणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:05 am

Web Title: reconstruction of sitabuldi fort in nagpur
टॅग : Nagpur News
Next Stories
1 लक्ष्मीनगर झोनमध्ये पाण्याच्या मीटरची चोरी
2 खाण दुर्घटना कमी करण्यास प्राधान्य -अनुप विश्वास
3 शाळांमध्ये आमूलाग्र बदलाची‘एज्युकॉम्प स्मार्टक्लास’ची योजना
Just Now!
X