News Flash

मीरा-भाईंदर मनपाच्या स्थायी समितीच्या अभ्यासदौऱ्याला लाल सिग्नल

मीरा-भाईंदरच्या विकासकामांना पैसा नसताना, राज्यात पाण्याची टंचाई, दुष्काळी परिस्थिती अशा स्थितीत करदात्यांच्या पैशावर स्थायी समितीने आखलेल्या १८ लाखांच्या परदेश दौऱ्याला आयुक्तांनी ‘लाल बत्ती’ दाखविल्याने सर्वपक्षीय

| April 3, 2013 01:29 am

मीरा-भाईंदरच्या विकासकामांना पैसा नसताना, राज्यात पाण्याची टंचाई, दुष्काळी परिस्थिती अशा स्थितीत करदात्यांच्या पैशावर स्थायी समितीने आखलेल्या १८ लाखांच्या परदेश दौऱ्याला आयुक्तांनी ‘लाल बत्ती’ दाखविल्याने सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्याांचा हिरमोड झाला आहे.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांचा मलेशिया-सिंगापूरचा ‘अभ्यासदौरा’आखला होता. आर्थिक मंजुरीसाठी हा प्रस्ताव आयुक्त सुरेश कांकाणी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, असा शेरा मारून दौऱ्याला लाल बावटा दाखवला. याबाबतचा निर्णय राज्यशासनच घेईल, शासनाने मंजुरी दिली तर आपण हा प्रस्ताव मंजूर करू असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:29 am

Web Title: red signal to study tour of mira bhayander standing committee
टॅग : Standing Committee
Next Stories
1 केक नको, मान द्या
2 गोरेगावमधील आरे कॉलनी ही मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखली जाते.
3 तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी ‘सैफ’ नाही
Just Now!
X