निकृष्ट व बनावट कामांची देयके मंजूर करण्याचा सपाटा महापालिकेत सुरू आहे. प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे हे शिवसेना-भाजप नेत्यांना खूश करण्यासाठी कारभार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते जया गुदगे यांनी केला. मवारंेकडील अतिरिक्त कारभार काढून घ्यावा, अशी विनंती गुदगे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली.
महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे हे प्रशिक्षणास गेले असल्याने मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार मवारे यांच्याकडे दिला आहे. मवारे हे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत आहेत. मनपाच्या अत्यावश्यक नियमित सेवा त्यांनी कारभार हाती घेतल्यापासून ढेपाळले आहे. ते ठेकेदारांसाठी काम करीत असून शहर अभियंता पदावर सखाराम पानझडे यांना बसविण्यास प्रयत्न करीत आहेत. स्थानिक शिवसेना नेत्यांना खूश करण्यासाठी त्यांचे सुरू असणारे प्रयत्न चुकीचे असल्याने मवारे यांच्याकडील कारभार काढून घ्यावा, अशी विनंती गुदगे यांनी केली.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय