पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे दिला असून, नवीन आसवानी प्रकल्प तीन वर्षांत उभा राहील. जुन्या व नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून दररोज २ लाख ४० हजार लिटर अल्कोहोल निर्माण करणारा विखे कारखाना हा राज्यात पहिला ठरणार आहे. आसवानी व सहवीज निर्मिती प्रकल्पांच्या खर्चाचा बोजा सभासदांवर पडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉलयर अग्निप्रदीपन समारंभ व अत्याधुनिक १२० केएलपीडी मल्टीप्रेशर आसवानी प्रकल्पाचे भूमिपुजन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सोमवारी झाले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष कारभारी ताठे, साखर कामगार सभेचे सरचिटणीस अविनाश आपटे, राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, सभापती निवास त्रिभूवन, उपसभापती सुभाष विखे, आदी उपस्थित होते.
साखर धंद्याच्या अस्थिर धोरणामुळे आपण यावर्षी ऊस भावाच्या स्पर्धेत राहाणार नसलो, तरी सभासद व कामगारांना नाराज करणार नाही, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, कारखान्याच्या भवितव्याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. परंतु शेतकरी, कामगार व सभासदांच्या संघटीत सहकार्यामुळे आपण कारखाना उíजतावस्थेत आणून तीन ते चार वर्षांत ११८ कोटींचा तोटा भरुन काढला. सध्या कारखान्याची अíथक परिस्थिती चांगली आहे. परंतु ऊस भावाच्या स्पर्धेत राहण्यासाठी कर्ज काढून भाव दिल्याने कारखान्याचा तोटा वाढत गेला होता. आपण हताश राहिलो असतो, तर परिसरातील इतर कारखान्यांसारखी आपली अवस्था झाली असती. परंतु धाडस व विश्वासाने निर्णय घेतल्याने कारखाना स्पर्धेत टिकू शकला.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १० हजार एकरावर ऊस लागवड करण्यात येणार असून, त्यासाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन सक्तीचे असून, यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यापुढे कर्ज काढून कारखाना चालवायचा नाही असा निर्णय घेतल्याची माहिती विखे यांनी दिली.  
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, अविनाश आपटे यांची यावेळी भाषणे झाली. दिपक पाटील यांनी आभार मानले.