News Flash

अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे लवकरच सुशोभीकरण -सतीश कुलकर्णी

शहरातील शिवाजी उद्यानातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे महानगरपालिकेच्या वतीने लवकरच सुशोभीकरण करण्याची ग्वाही उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

| March 21, 2013 02:50 am

शहरातील शिवाजी उद्यानातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे महानगरपालिकेच्या वतीने लवकरच सुशोभीकरण करण्याची ग्वाही उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
पंचवटीतील पलुस्कर सभागृहात धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीने महाराज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला, त्यानिमित्ताने ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. जयंत जाधव, नगरसेवक सचिन महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे, जयंती समितीचे बापू शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी उपमहापौरांनी मल्हारराव होळकरांच्या कर्तबगारीचा उल्लेख केला. आ. जाधव यांनी धनगर समाज असंघटित असल्याने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने बघितले जात नाही; परंतु त्यास नाशिक जिल्हा अपवाद असल्याचे सांगितले. धनगर समाजाचा पालिकेतील अनुशेष भरण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून त्याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. नगरसेवक सचिन महाजन यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्यासाठी निधी देण्याचे व धनगर समाजासाठी समाजमंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले. या वेळी मल्हारराव होळकर जयंती समितीचे राजाभाऊ पोथारे, प्रशांत रकटे, खंडेराव पाटील, रामदास राहटळ, हेमंत शिंदे, भागवत मुरडनर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2013 2:50 am

Web Title: renovation of ahilyabai holkar stachu satish kulkarni
Next Stories
1 वेळापत्रकाचे पालन आवश्यक
2 नणंद-भावजय घाटात वन विभागाच्या वाहनावर गोळीबार
3 इंदिरानगर पोलीस ठाण्यास मिळणार स्वत:ची इमारत
Just Now!
X