खांदा वसाहतीमधील उद्यानात खेळणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चक्कबच्चेकंपनीने एका निवेदनाद्वारे सिडकोकडे केली आहे.
खांदा वसाहतीमध्ये सेक्टर-९ येथे सिडकोने उद्यान उभारले आहे. या उद्यान बच्चेकंपनी सुट्टीच्या दिवसांत खेळतात पण हे खेळ विनाखेळण्यांनी त्यांना खेळावे लागत आहे. याबद्दल मुलांच्या असलेल्या नाराजीकडे थेट सिडकोच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधावे यासाठी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी या मुलांची भेट थेट सिडको अधिकाऱ्यांशी त्यांच्या कार्यालयात करून दिली.  या वेळी खांदा वसाहतीमधील हर्ष साटम, क्षितिज साटम, भरत कोरी, उज्ज्वल जाधव, शिवम पाटील, अक्षय बनसोडे, मनजित लखोलिया, अभिषेक लामखडे, सुमेध वाघमारे, मिरज मरियाप्पगोळ या मुलांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. स्वच्छतागृहाची सोय करावी, उद्यानात पिण्याच्या पाण्यासाठी टाकी उभारावी, अशी मागणी केली. सिडकोचे अधीक्षक अभियंता प्रदीप तांबडे यांनी सकारात्मक विचार करून उद्यानात खेळणी बसवू, असे आश्वासन दिले.