News Flash

विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढण्याची गरज – डॉ. राय

दैनंदिन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबध येत असल्यामुळे या विषयांचा अभ्यास करताना निरीक्षण आणि संशोधनात्मकवृत्ती

| January 9, 2014 08:34 am

दैनंदिन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबध येत असल्यामुळे या विषयांचा अभ्यास करताना निरीक्षण आणि संशोधनात्मकवृत्ती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विचार करून समाजात जागृती केली पाहिजे, असे असे आवाहन भारतीय परमाणू खनिज अन्वेषण व अनुसंधान संचालनालयाचे अतिरिक्त संचालक व कृषीतज्ज्ञ डॉ. अश्विनी कुमार राय यांनी केले.
विज्ञान आणि समाज यामधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने रामन विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय ‘सायन्स एक्स्पो’चे उद्घाटन डॉ. राय यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला भारतीय कृषी अनुसंधान संस्थामधील प्राध्यापक डॉ. सी.डी मायी, केंद्राचे प्रकल्प संचालक विश्वनाथ जोशी,  यावेळी बीएसएनएलचे डॉ. पटेल, जीएसआयचे डॉ. ईस्वरा, डॉ. ए.के. जोशी, डॉ. के. रवी, अरविंद मुजुमदार, शिक्षणाधिकारी विलास चौधरी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राय म्हणाले म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रत्रानाच्या दृष्टीने प्रगती होत आहे. अन्य देशाच्या तुलनेत आपल्या कृषी क्षेत्रात संसोधन होत नाही. जगामध्ये प्रगती होत असताना आपण अनेक जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करीत असतो आणि त्यावर ते संशोधन करून नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न करीत असतात. विज्ञानाविषयीची विद्यार्थ्यांंमध्ये गाडी निर्माण करताना त्यांच्यामध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण करण्याची गरज आहे तरच हा समाज प्रगती करू शकेल, असेही डॉ. राय म्हणाले.
विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानासंदर्भात भारतामध्ये अनेक संस्था काम करीत आहेत, मात्र त्यातून पाहिजे त्या प्रमाणात संशोधन केले जात नाही.
डॉ. मायी म्हणाले, गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे विद्यार्थ्यांंचा वाढता प्रतिसाद बघता विज्ञानाकडे दुर्लक्ष होऊ लागले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचे मोठे महत्त्व आहे, मात्र आपल्याकडे संशोधनात्मक काम कमी झाले आहे. समाजाची प्रगती करण्याच्या दृष्टीने विज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता विद्याथ्यार्ंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे.
या ‘सायन्स एक्स्पो’मध्ये नागपुरातील परमाणू खनिज अन्वेषण व संशोधन संचालनालय, पट्रोलियम कॉन्झर्वेशन रीसर्च असोसिएशन, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ स्ोंशोधन संस्था, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण, क्षेत्रिय सुदूर संवेदन केंद्र, केंद्रीय भूमीजल बोर्ड, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था, रामन विज्ञान केंद्र व तारामंडळ, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आदी १६ संस्था सहभागी झाल्या असून विद्याथ्यार्ंना वेगवेगळ्या विषयाची माहिती दिली जात आहे.
शहरातील अनेक शाळेतील विद्याथ्यार्ंनी यावेळी प्रदर्शनाला भेटी देऊन माहिती घेतली. प्रदर्शनात विविध विषयावर विद्यार्थ्यांंसाठी मान्यवरांची भाषणे आयोजित करण्यात आली आहे. विश्वनाथ जोशी यांनी सायन्स एक्स्पोची माहिती दिली. संचालन अभिमन्यू भेलावे यांनी केले. विलास चौधरी यांनी आभार मानले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 8:34 am

Web Title: research attitude to increase in students dr ray
Next Stories
1 शेतकरी संघटना महायुतीत जाणार का?
2 गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ‘रेस्क्यू सेंटर’ होणार
3 अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून ३५ टक्के नागरिक राहणार वंचित
Just Now!
X