News Flash

ज्ञान अमृत आदिवासी संस्थेचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

ज्ञान अमृत बहुउद्देशीय आदिवासी संस्थेला येथील प्रगती महिला शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने म्हाडाचे सभापती नरेंद्र दराडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

| May 31, 2013 02:27 am

ज्ञान अमृत बहुउद्देशीय आदिवासी संस्थेला येथील प्रगती महिला शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने म्हाडाचे सभापती नरेंद्र दराडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ज्ञान अमृत बहुउद्देशीय आदिवासी संस्थेमार्फत विविध सेवाभावी, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, मनोरुग्ण व कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी मिठाई वाटप इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी प्रा. डी. के. गोसावी, डॉ. यशवंत पाटील, प्रा. राम कुलकर्णी, जया वाघ आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 2:27 am

Web Title: reward for tribal orgnisation
Next Stories
1 ग्रामीण भागातील विद्यालयांचे निकाल समाधानकारक
2 पर्जन्यवृष्टीसाठी यज्ञाचा ‘अंनिस’तर्फे निषेध
3 ‘सत्ताधारी व विरोधक दोघांनी विश्वासार्हता गमावली’
Just Now!
X