30 September 2020

News Flash

विचित्र अपघातात रिक्षाचालक ठार

दुचाकीचालकाची धडक बसून रिक्षाचालक रिक्षातून बाहेर फेकला गेला व त्याच्या थेट डोक्यावरून एक मालमोटार जाऊन मृत्यूमुखी पडला. औरंगाबाद रस्त्यावरील नटराज हॉटेलजवळ आज दुपारच्या सुमारास हा

| January 23, 2013 03:23 am

दुचाकीचालकाची धडक बसून रिक्षाचालक रिक्षातून बाहेर फेकला गेला व त्याच्या थेट डोक्यावरून एक मालमोटार जाऊन मृत्यूमुखी पडला. औरंगाबाद रस्त्यावरील नटराज हॉटेलजवळ आज दुपारच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला अल्ताफ शेख (रा. नागापूर, एमआयडीसी) या रिक्षाचालकाला यात आपले प्राण गमवावे लागले. ते आपल्या रिक्षाने (एम.डब्लू.ए.-३७९५) पोलीस अधीक्षक चौकाकडे जात होते. समोरच्या रस्त्याने(आरटीओकडून) चुकीच्या बाजूने एक बुलेटस्वाराने (एम.एच.१७ ३७९५) त्यांच्या रिक्षाला धडक दिली. त्यात अल्ताफ शेख रिक्षाच्या बाहेर फेकले गेले. त्याचवेळी त्यांच्या रिक्षाच्या मागून येणाऱ्या मालमोटारीखाली (टी.एम. ५२-सी.७९२५) त्यांचे डोके सापडले व त्यात ते जागीच ठार झाले. नगरसेवक अरीफ शेख, समद खान, हाजी नजीर शेख, आयुब शेख, तसेच रशीद खान यांनी माहिती मिळाल्यावर त्वरेने घटनास्थळी येऊन शेख यांना रुग्णालयात नेले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पोलिसांनी मालमोटारचालक पशूपती राज (रा. तमिळनाडू) याला लगेचच ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2013 3:23 am

Web Title: rickhaw driver dead in an accident
Next Stories
1 जिल्हा नियोजन समितीवर पाचजण बिनविरोध
2 ‘हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी’ ची केईएममध्ये सोय
3 ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ ची हाँगकाँगमध्येही शाखा
Just Now!
X