News Flash

‘कांची’च्या सेटवर ऋषी कपूरने गिटारवर वाजविली ‘दर्द ए दिल दर्द ए जिगर’ची धून

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी अनेक नवीन अभिनेत्री बॉलिवूडला दिल्या आहेत. आता ‘कांची’ या आपल्या आगामी चित्रपटाद्वारेही मिष्टी ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावर पदार्पण

| April 21, 2013 01:25 am

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी अनेक नवीन अभिनेत्री बॉलिवूडला दिल्या आहेत. आता ‘कांची’ या आपल्या आगामी चित्रपटाद्वारेही मिष्टी ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे ‘कर्ज’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा सुभाष घई-ऋषी कपूर एकत्र आले आहेत. तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते एकत्र आले असून मिथुन चक्रवर्तीचीही यात प्रमुख भूमिका आहे.
‘कर्ज’मध्येही ऋषी कपूरने त्याचे आवडते वाद्य गिटार वाजविले होते. आता ‘कांची’मध्येही तो पुन्हा एकदा गिटार वाजविताना दिसणार आहे. एका उद्योगपतीची भूमिका त्याने साकारली आहे. मढ बेटावर झालेल्या चित्रीकरणादरम्यान ऋषी कपूरने गिटारवर कर्ज चित्रपटातील सुप्रसिद्ध धून वाजवली तेव्हा सुभाष घईंच्या युनिटमधील सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
घईंच्या प्रथेप्रमाणे हा चित्रपटही संगीतप्रधान असेल. इस्माइल दरबार आणि सलीम-सुलेमान अशा संगीतकारांनी स्वरसाज चढविला आहे.  सुरुवातीला १५ ऑगस्ट ही तारीख प्रदर्शनासाठी मुक्रर करण्यात आली होती. परंतु आता ३० ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:25 am

Web Title: rishi kapur played guitar on the set of kanchi
Next Stories
1 पहिला इंडियन आयडॉल म्हणतोय अजून स्ट्रगल सुरूच
2 तपश्चर्या फळाला आली..
3 अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमाबद्दल ‘करिअर फेयर’मध्ये मार्गदर्शन
Just Now!
X