News Flash

भीषण अपघातात अकोल्याच्या नानोटी कुटुंबातील दोघे ठार प्

अकोल्याहून खामगावकडे येणाऱ्या ट्रेलरचे समोरील टायर फुटून ते मागून येत असलेल्या उनो कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. अकोला-बाळापूर महामार्गावर भीमकुंड नदीच्या

| June 2, 2013 01:22 am

अकोल्याहून खामगावकडे येणाऱ्या ट्रेलरचे समोरील टायर फुटून ते मागून येत असलेल्या उनो कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. अकोला-बाळापूर महामार्गावर भीमकुंड नदीच्या पुलावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात ठार झालेल्यांमध्ये गौरव अनिल नानोटी (२६) व सुधाकर पुरुषोत्तम नानोटी (७०, रा. जुना राधाकिसन प्लॉट, अकोला) यांचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रेलरचे टायर फुटल्यानंतर नानोटी यांची फि याट उनो कार सुमारे ५०० मिटर अंतरापर्यंत रस्त्यावरच फेकली गेली. त्यानंतर उनो गाडीत अडकलेल्या नानोटी कुटुंबीयांचे मृतदेह महामार्ग पोलिसांना अक्षरश: ओढून काढावे लागले.
प्राप्त माहिती नुसार जी.जे.५-ए.टी. १५५ हा ट्रेलर अकोल्याहून खामगावकडे येत होता. त्यामागेच फियाट उनो कार (क्र. एम.एच.३० एफ. ४११) भरधाव येत होती.
उनो कारमधून सुधाकर नानोटी व गौरव नानोटी हे औरंगाबादला जात होते. दरम्यान, समोरील ट्रेलरच्या बाजूने कार जात असतांना ट्रेलरचे उजव्या चालक बाजूचे टायर अचानक फुटले आणि हा भीषण अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदतकक्षाचे पोलिस उपनिरीक्षक आर.आर.पेठे, पोलिस कर्मचारी सुमेरसिंह ठाकूर, शैलेश पाचपोर, नरेश पाटेकर, नरेश कश्यप घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी अपघातातील नानोटी कुटुंबीयांचे मृतदेह बाहेर काढले व अकोला येथे पाठविले. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे २ तास खोळंबली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 1:22 am

Web Title: road accident took two lives of nanoti family
टॅग : Crime News
Next Stories
1 जखमी बिबटय़ाचा घरात ठिय्या, गाव हादरले
2 विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेत चुकांची परिसीमा
3 पावसाळ्यातील आपात्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिका सज्ज
Just Now!
X