News Flash

छेडछाडीचे प्रकार थांबविण्यास महिला पोलिसांचे दामिनी पथक

महिलांची छेडछाड होऊ नये, म्हणून औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्तालयामार्फत ‘दामिनी’ उपक्रम सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिरत्या वाहनाला हिरवा

| January 9, 2014 01:50 am

महिलांची छेडछाड होऊ नये, म्हणून औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्तालयामार्फत ‘दामिनी’ उपक्रम सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. महिला जागृतीसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यां व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची या वेळी उपस्थिती होती.
शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये तक्रार पेटी ठेवण्यात आली असून, एखादी तक्रार तेथे केली तरी त्याची दखल पोलीस घेतील आणि कारवाई करतील. या बरोबरच शहरात रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या एकटय़ा महिलेला घरी जाताना सुरक्षित वाटत नसेल, तर दामिनी पथक त्यांना घरापर्यंत जाण्यास मदत करील. शहरात बऱ्याचदा रुग्णालयात एकटय़ा जाणाऱ्या महिलेला त्रास होतो. अशा महिलांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी दामिनी पथकातील पोलीस प्रयत्न करणार आहेत. पथकात महिला पोलीस निरीक्षक व चार महिला पोलीस कर्मचारी असतील. पथकासाठी दिलेल्या गाडीत प्रथमोपचार पेटी, स्ट्रेचर असे साहित्यही असेल. गेल्या काही दिवसांपासून असे पथक शहरात असावे, या साठी प्रयत्न सुरू होते. पूर्वी या पथकात काही पुरुष कर्मचारी होते. या वेळी नव्याने झालेल्या भरतीत महिला वाहनचालकही उपलब्ध झाल्याने या पथकाला ‘दामिनी’ असे नाव देण्यात आले आहे. वाहनावर मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकही देण्यात आले आहे. दामिनी पथकाचा भ्रमणध्वनी ९१५८०४२४४४ असा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 1:50 am

Web Title: road romeo damini scod for women aurangabad
टॅग : Aurangabad
Next Stories
1 शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्षच; तिसऱ्या दिवशीही शाळेला कुलूप
2 लघुप्रकल्पांचे सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
3 तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची घटस्थापना
Just Now!
X