18 September 2020

News Flash

महापौर मॅरेथॉन स्पर्धेसह परभणीत आज ‘रोड शो’

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत महापौर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सिनेअभिनेता संजय नार्वेकर व केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंचा रोड शो होणार आहे.

| December 12, 2012 12:42 pm

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत महापौर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सिनेअभिनेता संजय नार्वेकर व केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंचा रोड शो होणार आहे. उद्या (बुधवारी) स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते होईल. आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख, जि. प. अध्यक्षा मीना बुधवंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी खासदार सुरेश जाधव, विजय वरपूडकर, बाळासाहेब जामकर, सज्जुलाला, समशेर वरपूडकर, अ‍ॅथलेटिक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य के. एस. शिंदे, डॉ. माधव शेजूळ आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता स्पर्धेचा प्रारंभ संत तुकाराम महाविद्यालय मैदानावरून होणार आहे. ‘देढ फुटय़ा’ फेम अभिनेता संजय नार्वेकर व केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू हिलरी कोच यांचा रोड शो या वेळी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 12:42 pm

Web Title: road show in parabhni along with mayor marathon competition
Next Stories
1 चार वाळू माफियांवर गडचिरोलीत गुन्हा
2 नांदेडला भरवस्तीत सात लाखांची चोरी
3 रुग्णसेवा वाऱ्यावर, वादाचे रोजचे रडगाणे!
Just Now!
X