30 May 2020

News Flash

शेतीच्या पाण्यासाठी कोपरगावला रास्ता रोको

मराठवाडय़ासाठी जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असताना गोदावरी उध्र्व खोऱ्यातील ९ टीएमसी पाणी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय कोपरगाव तालुका उजाड करणारा आहे. मराठवाडय़ाला पिण्याचे पाणी

| November 27, 2012 03:15 am

मराठवाडय़ासाठी जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असताना गोदावरी उध्र्व खोऱ्यातील ९ टीएमसी पाणी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय कोपरगाव तालुका उजाड करणारा आहे. मराठवाडय़ाला पिण्याचे पाणी देण्यापूर्वी कोपरगावच्या हक्काच्या ११ टीएमसी पाण्याची सोय लावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांनी रास्ता रोको प्रसंगी केली.
काळे पुढे म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या हक्काच्या अकरा टीएमसी पाण्यासाठी ब्रिटिशांनी गंगापूर व दारणा ही धरणे १०० वर्षांपूर्वी बांधली. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून या भागाचे पाणी विविध कारणाखाली पळविले व आताही जबरदस्तीने मराठवाडय़ाला नाशिक-नगर जिल्ह्य़ातील ९ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जनतेला देशोधडीला लावणारा आहे.
जायकवाडी धरणातील मृतसाठय़ापैकी १५ टीएमसी पाणी गुजराथ शासनाच्या योजनेप्रमाणे वापरावे यासाठी या पाण्याचे तातडीने सर्वेक्षण होऊन याबाबतचा अहवाल जनतेपुढे सादर करावा. कोपरगाव शहराला पाच दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते, परंतु नाशिक, औरंगाबादला रोज पाणी मिळते. या पाण्यात किमान १५ ते २० टक्के कपात केल्यास मराठवाडय़ाचा पाणी प्रश्न निश्चित सुटतो. निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यापैकी अवघे एक टीएमसी पाणी जायकवाडीत गेले. यापासून काहीच धडा न घेता राज्य सरकारने जायकवाडीस नऊ टीएमसी पाणी दिल्यास ५ टीएमसी पाणी वाया जाणार आहे. नगर व नाशिक जिल्ह्य़ातील सहा टीएमसी पाण्याची उधळपट्टी करून राज्य सरकार कोणते हित साधणार आहे? राज्य सरकारने पाण्याबरोबरच शेतीला पाणी पुरवावे, तसेच २ रब्बी व २ उन्हाळी आवर्तने शेतीस द्यावीत, अशी मागणी काळे यांनी केली.
आंदोलन सुरू असतानाच र. फ. शिंदे, सोमनाथ चांदगुडे, लहानुभाऊ नगरे, पद्माकांत कुदळे, सुभाष कुलकर्णी आदींची भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2012 3:15 am

Web Title: road stoped strick in kopargao on water for farming
टॅग Strick
Next Stories
1 ‘दृष्टिकोन’ छायाचित्र प्रदर्शन शुक्रवारपासून
2 शिवसेनाप्रमुखांना कोल्हापुरात सर्वपक्षीय श्रद्धांजली
3 मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्य़ानंतर आरोपी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X