News Flash

मनमाडमधील रस्ते सुंदर करणार- आ. पंकज भुजबळ

शहराच्या वेशीतील मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, याच पद्धतीने शहराच्या इतर भागांतही पेव्हर ब्लॉक बसविले जाणार आहेत. शहर स्वच्छ व सुंदर दिसावे

| April 26, 2013 02:45 am

शहराच्या वेशीतील मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, याच पद्धतीने शहराच्या इतर भागांतही पेव्हर ब्लॉक बसविले जाणार आहेत. शहर स्वच्छ व सुंदर दिसावे म्हणून हे काम करण्यात आले आहे, असे प्रतिपादन आ. पंकज भुजबळ यांनी येथे केले.
आ. भुजबळ यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे पाच लाख रुपये खर्च करून मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राजाभाऊ पगारे होते. वेशीतील दक्षिणमुखी मारुती मंदिर, नीलमणी मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, बालाजी विठ्ठल मंदिर, बालाजी मंदिर, श्रीराम मंदिर, शनी मंदिर व चाँदशाहवली दर्गा असा हा संपूर्ण परिसर पेव्हर ब्लॉकने सुशोभित करण्यात आला आहे.
 विविध ठिकाणी विजय नाईक, मधुकर बागोरे, पोपट ललवाणी, शांतिलाल पारिक, सुरेश मालपाणी, पारिक बाबूजी, विजय नाईक, प्रकाश कुलकर्णी आदींनी आ. भुजबळ यांचा सत्कार केला. पप्पू परब यांनीही त्यांचा सत्कार केला. नगरसेवक गौतम संचेती यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सी. एच. बागरेचा यांनी पिंपळवाडा भागात जैन स्थानक व मशीदसमोरील रस्त्यावरही पेव्हर ब्लॉक बसविण्याची सूचना केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:45 am

Web Title: roads in manmad will going to developed mla pankaj bhujbal
टॅग : Manmad,Pankaj Bhujbal
Next Stories
1 महात्मा गांधी विद्यामंदिरतर्फे व्यंकटराव हिरे यांना अभिवादन
2 मनसे शिक्षक आघाडीची आज सहविचार सभा
3 उड्डाण पुलालगतच्या रस्त्यावर ‘सिग्नल’ची मागणी
Just Now!
X