News Flash

मनमाड-येवला रस्त्यावर वाहनलुटीच्या घटनांमध्ये वाढ

मनमाड ते येवला हा रस्ता अवघात आणि वाढत्या रस्ता लुटीच्या घटनांमुळे वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे.

| May 22, 2014 12:20 pm

मनमाड ते येवला हा रस्ता अवघात आणि वाढत्या रस्ता लुटीच्या घटनांमुळे वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. या महामार्ग जाणाऱ्या अनकाई आणि कासारखेडा परिसरात नेहमीच वाहनचालकांना मारहाणीच्या घटना घडत असतात. वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले जाते. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली असून येवला पोलिसांचे लक्ष नसल्याने चोरटय़ांचे फावत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे.
येवला-मनमाड महामार्गावर पोलीस चौकी नसल्याने चोरटय़ांना वाहनचालकांना लुटणे सहज शक्य होते. या भागात अनेक चालकांना लुटण्यात आले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा कोणताच वचक नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रविवारी या मार्गावरील कासारखेडा शिवारात परराज्यातील ट्रकचालक शेर अली दाऊद शेख यांना पाच जणांनी चॉपरचा धाक दाखवून जबर मारहाण केली. त्यांनी खिशातील पैसे घेऊन पोबारा केला. ही घटना सकाळी सातच्या सुमारास घडली. परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. ग्रामस्थ आणि पोलिसांनी तीन चोरटय़ांना सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यात ग्रामस्थांची मदत मिळाली म्हणून हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांची जर गस्त असती तर कदाचित हा प्रकार टळू शकला असता. पोलिसांनी या रस्त्यावर गस्त न वाढविल्यास एखाद्या चालकाचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. रात्रीच्या वेळी पोलिसांनी जर या भागात गस्त सुरू केली तर निश्चितच लुटीच्या घटनांना आळा बसू शकेल, असे ग्रामस्थांचे मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 12:20 pm

Web Title: robbery cases increase on manmad yeola road
टॅग : Robbery
Next Stories
1 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १८ बांगलादेशींना अटक
2 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ कोटी प्राप्त
3 पिंपळगाव नाक्यावरील टोल वाढ तूर्तास स्थगित
Just Now!
X