News Flash

घरफोडय़ा करणा-या टोळीला अटक

जिल्ह्य़ाच्या दक्षिणेकडील ग्रामीण भागात भरदिवसा घरफोडय़ा करणाऱ्या टोळीला सोमवारी गुन्हाअन्वेषण पथकाने अटक केली. पाच जणांच्या टोळीने आठ ठिकाणी घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आले आहे.

| December 3, 2013 02:03 am

   जिल्ह्य़ाच्या दक्षिणेकडील ग्रामीण भागात भरदिवसा घरफोडय़ा करणाऱ्या टोळीला सोमवारी गुन्हाअन्वेषण पथकाने अटक केली. पाच जणांच्या टोळीने आठ ठिकाणी घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आलेआहे. त्यांच्याकडून ५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.    
आजरा, चंदगड व गडहिंग्लज या तीन तालुक्यांमध्ये या टोळक्याने भर दिवसा चोऱ्या केल्या होत्या. या प्रकरणी सुनील प्रकाश पाटील (वय २५), अशोक भुजंगा पाटील (वय ४३), संतोष वसंत पाटील (वय २०), युवराज चालोबा गाडीवडर (वय २६), धनाजी राजाराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुनील पाटील व अशोक पाटील (रा.बटकणंगले, ता.गडहिंग्लज) आरामी जीवन जगत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांना मिळाली होती. त्यांनी या दोघांनाताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यावर उपरोक्त अन्य तिघांसह आठ ठिकाणी घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. या आरोपींनी प्रियदर्शनी महिला बँक, आजरा अर्बन बँक येथे सोने गहाणवट ठेवून कर्जाची उचल केली होती. कर्जाची रक्कम त्यांनी वाटून घेतली होती. ग्रामीण भागातील शेतकरी घर बंद करून कामावर गेल्यावर घराची कौले काढून आत प्रवेश करून ते चोऱ्या करीत असत. या तपासाबद्दल पोलीस दलाकडून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 2:03 am

Web Title: robbery gang arrested 3
टॅग : Arrested,Robbery Gang
Next Stories
1 विधी खात्याची आता पक्षकारांसाठी मोबाईल सेवा
2 विद्यार्थी असल्याची थाप मारून चोरटय़ाने शिक्षकाला लुटले
3 काँग्रेसच्या मंत्र्यांचे पुन्हा एकला चलो रे…
Just Now!
X