10 August 2020

News Flash

साक्रीत दरोडा: चार लाखांची लूट

दरोडेखोरांनी सुमारे चार लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करतानाच घरातील सदस्यांना मारहाण केल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना शहरातील छोरीया टाऊनशिप वसाहतीत शुक्रवारी पहाटे घडली.

| February 1, 2014 02:41 am

दरोडेखोरांनी सुमारे चार लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करतानाच घरातील सदस्यांना मारहाण केल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना शहरातील छोरीया टाऊनशिप वसाहतीत शुक्रवारी पहाटे घडली. सहा जणांच्या टोळीने टाकलेल्या या दरोडय़ाने शहराजवळील वसाहतींमधील रहिवासी भयभीत झाले आहेत.
अंबापूर रस्त्यावरील छोरीया टाऊनशिपमध्ये मार्बल व्यावसायिक बाबुलाल जाट यांचा बंगला आहे. पहाटे दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी बंगल्याच्या मागील दरवाजास धक्का दिल्याने तो उघडला. तोंडावर रुमाल बांधलेल्या तीन दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून हिंदी भाषेत जाट कुटुंबीयांना धमकाविण्यास सुरुवात केली. या वेळी घरात बाबुलाल जाट, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, त्यांचे चुलतबंधू सरवन जाट उपस्थित होते. बाबुलाल आणि सरवन यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे सर्वच भयभीत झाले. दरोडेखोरांनी पैशांची मागणी करीत रोख तीन लाख रुपयांसह सुमारे ९५ हजार रुपयांचे दागिने ताब्यात घेतले. याच वेळी जाट यांच्या घराशेजारी राहणाऱ्या नागठीया यांच्या घरावर बाहेर पाळत ठेवणाऱ्या तीन दरोडेखोरांनी दगडफेक करून त्यांना धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवली नाही. लूट झाल्यावर जाट यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद करीत दरोडेखोर पसार झाले.
दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना साक्री ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी भेट देऊन पाहणी केली. साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2014 2:41 am

Web Title: robbery in sakri worth four lakhs
टॅग Robbery
Next Stories
1 डीटीएड, बीएड विद्यार्थ्यांच्या समस्यांवर मंथन
2 आडगाव शिवारात रुग्णवाहिका आणि मोटारीची तोडफोड
3 महिलांसाठी देश सुरक्षित करण्याची गरज
Just Now!
X