दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून सदनिकेमध्ये प्रवेश केलेल्या अज्ञात चोरटय़ांनी कपाटाच्या तिजोरीमधील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड येथील केशवनगर परिसरात ही घरफोडी झाली. देवानंद अर्जुन जोगळेकर (वय ३९, रा. फ्लॅट न. ७, गंगाराज पार्क, केशवनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (१७ फेब्रुवारी) रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी साडेसहा या वेळात सदनिका कुलूप लावून बंद असताना ही घरफोडी झाली आहे. दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून चोरटय़ांनी घरामध्ये प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाची तिजोरी उचकटून चोरटय़ांनी आठ हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे
दागिने असा एक लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज
लांबविला. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. पी. माने
पुढील तपास करीत आहेत.