एकविसावे शतक हे रोबोटिक्सचे असून या क्षेत्रात सातत्याने निरनिराळे प्रयोग केले जात आहेत. त्यात अभियांत्रिकी महाविद्यालयेही मागे नाहीत. नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील संकुलातील ‘रामराव आदिक इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ‘जेनेसिस’ या तंत्र महोत्सवात या क्षेत्रात होणारे विविध प्रयोगांची झलक पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचे ‘लोकसत्ता’ हे माध्यम प्रायोजक आहे.
दरवर्षी महाविद्यालयातर्फे जेनेसिस व नियंत्रण हे दोन तंत्र महोत्सव आयोजित केले जातात. ‘जेनेसिस’चे हे यंदाचे १०वे वर्ष आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जेनेसिसला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात नवनवीन संकल्पनांचा समावेश करण्यात आाला आहे.
यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ. डी. वाय. पाटील संकुलाची व स्टेडियमची प्रतिकृती बनविणार आहेत. तसेच सिंगापूर येथे होणाऱ्या ‘एफ-१’ कार रेसिंगचा मिनी ट्रॅक बनवून त्यावर रोबोंची स्पर्धा आयोजिण्यात येणार आहे. यंदाच्या जेनेसिसचे वैशिष्टय़ म्हणजे पाण्यावर होणारी रोबोंची स्पर्धा. या शिवाय सर्व अभियांत्रिकी विदयार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरतील अशी करिअर व नोकरीविषयक कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नोकरभरतीची माहिती आणि मुलाखतीचे प्रशिक्षण देण्यात येईल. नोकरभरतीच्या वेळेस येणाऱ्या अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड देता यावे, यासाठी या कार्यशाळेचा समावेश करण्यात आला आहे. या शिवाय ‘इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रमेन्टेशन’मधून अभियांत्रिकी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पीएलसी-स्काडा हा अतिशय ज्ञानबोधक असा परिसंवाद ठेवण्यात आला आहे.
फिफा११, एनएफएस, काऊन्टर स्ट्राईक१.६ सारखे लॅन गेम देखील महोत्सवात असतील. या खेळांना दरवर्षी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. शिवाय अभ्यास निबंधांचे सादरीकरण देखील असणार आहे. या महोत्सवात तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच कुठल्याही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांला सहभागी होता येईल. कारण महोत्सवात अनेक गंमत खेळांचाही समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – अदित्य जयराज-७६६६२८६५५६, करण हकसर – ९७७३२०१८०१, चैतन्य नाझीरकर झ्र् ७२७६५४३११०